Shree Shramik Balaji Trust 2013 - 2025
भाविकांना सर्व प्रकारची सुख-शांती देणारा समृध्दी देणारा देव म्हणून देशात परदेशात ओळखला जाणारे तिरुपती बालाजींचे नांव नगरमध्ये मात्र श्रमिक बालाजी असे आहे. श्रीमंत देवाचे नांव श्रमिक बालाजी का? असा प्रश्न सहज मनात येत असणारा त्याचे उत्तर सोपे आहे.
अहमदनगर शहरातील बिडी कामगारांची एक वस्ती उभारण्यात आली. ही वस्ती कष्टकरणार्‍या, श्रमकरणार्‍या श्रमिकांची असल्याने त्या वस्तीत श्रमिकनगर असे नामकरण करण्यात आले. या ठिकाणी राहणार्‍या बालाजी भक्तांनी आपल्या श्रमातून, श्रमदानातून तिरुपती बालाजी मंदिर बांधले तेव्हा पासुन या तिरुपती श्रीमंत बालाजीला श्रमिक बालाजी असे संबोधण्यात येऊ लागले. हे नाव कोणी ठेवले सांगणे अशक्य आहे. मात्र ही सर्वसामान्य लोकांनी उस्फुर्तभाव क्रिया आहे.
नावात वेगळेपणा असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यातील सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या दिवशी बालाजी कल्याणम या नावाने वार्षिक उत्सव आगळ्या-वेगळ्या पध्दतीने गेल्या २० वर्षापासून साजरा केला जातो. या श्रमिक बालाजीच्या उत्सवाच्या व मंदिराचा इतिहास स्फुर्ती देणारा, उत्साह देणारा रोमांचकारी आहे.
या मंदिराची श्री मुर्ती आंध्रप्रदेशामधील नालगोंडा या गावी बनविण्यात आली. सन १९९३ साली मोठया उत्साहात धार्मिक वातावरणात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. श्रमिकनगर येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात श्रीमंतबालाजीचा प्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या या देवाला श्रमिक बालाजी असे आपोआपच नांव पडले.
श्रावण महिन्यात होणार्‍या वार्षिक उत्सवास एका मोठ्या जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. उत्सवच्या दिवसात दाक्षिणात्य पध्दतीने श्रमिक बालाजींची पुजा, होम, हवन होते, राज्यभरातुन व राज्याबाहेरुन येणारे भाविक येथेही केसाअर्पण करतात. पुर्ण लग्नाचा सोहळा साजरा करण्यात येतो. भाविकांना महाप्रसाद वाटला जातो. या धार्मिक उत्सवाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घातला आहे. श्रमिकनगर मधील भाविकांनी तन-मन-धन, समर्पित करुन आपले वेगळेपण उत्सवातील पावित्र्य, संस्कृतमय, धार्मिक वैभव टिकवून ठेवले आहे. दिवसेंदिवस नावलौकिक मिळविणार्‍या श्रमिक बालाजी मंदिराच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांना भाविकांच्या दातृत्वाची गरज आहे. कार्यकर्त्यांना भक्तांच्या तन-मन–धन या त्रिवेनी संगमाची गरज आहे. म्हणजे सर्वांना सुख-शांती समृध्दी देणार्‍या श्रमिक बालाजी मंदिराच्या सर्वांगाने विकास होईल.
या मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम दाक्षिणात्य शैलिमध्ये सुरु करण्यात आले आहे. या जिर्णोध्दारासाठी भाविकांनी मदत केली आहे. तरी यापुढेही जिर्णोध्दार कामासाठी सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती.

     - संजय रा. वल्लाकट्टी,                                                                                                      - विठ्ठ्ल बुलबुले (संपादक - विचारधारा प्रकाशन)
श्रमिकनगरचा “श्रमिक बालाजी"